Social Tour to Shantivan – Balgram

Social Tour – A Tour for a social cause

तीर्थयात्रा मानवतेच्या मंदिरांची…
एक सफर, पाच सामाजिक प्रकल्पांची

प्रसिद्धीपासून दूर राहून, निरपेक्ष वृत्तीने काम करणारी पुष्कळ मंडळी महाराष्ट्रात आहेत. मात्र ह्या सर्वांचं काम आजही म्हणावं तेवढं आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. ह्यापैकी काही अवलियांचे हे प्रकल्प जवळून अनुभवण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी उन्नयन टूर्सची ही विशेष सामाजिक सहल.

खरंतर ही सहल नाहीच. मानवतेच्या मंदिरांची ही तीर्थयात्राच. ह्या यात्रेत आपण भेट देत असलेल्या, मानवतेचं काम करणाऱ्या ह्या अवलियांचा थोडक्यात परिचय -

अनंत झेंडे (महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था)
गावातील शाळेत शिपायाचं काम करणारा हा तरुण आपल्या पगारातली पै-पै वाचवून पारधी समाजातील सुमारे ७० मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याचं काम करतो आहे. त्याच्या महामानव बाबा आमटे सामाजिक विकास सेवा संस्था ह्या संस्थेमार्फ़त स्पर्धा परीक्षांसाठी एक अद्ययावत वाचनालयही उभं राहीलं आहे. आमटे परिवाराने त्याचं काम पाहून बाबा आमटेंचं नाव वापरण्याची परवानगी त्याला दिली आहे ह्यातच सर्वकाही आलं.

दीपक नागरगोजे (शांतीवन)
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दीपक नागरगोजे ह्यांनी आनंदवनाच्या कामापासून प्रेरणा घेत बीडजवळ एका ओसाड माळरानावर अक्षरशः नंदनवन फुलवलं आहे. प्रामुख्याने अनाथ, बेघर, निराधार, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं आणि विधवा, घटस्फोटित स्त्रीया ह्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणारी त्यांची शांतीवन ही संस्था आता शेतीचे नवनवे प्रयोगही करू लागली आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीवर जिद्दीने मात करत शांतीवन इतर शेतकऱ्यांना नवीन शेततळी खणण्यासाठी आणि पर्यायाने स्वतःच्या पायावर हिमतीने उभं राहण्यासाठी मदत करत आहे. मुलींसाठी शाळा, कॉलेज आणि वसतीगृह असलेला मराठवाड्यामधला सर्वात मोठा प्रकल्प शांतीवन उभारत आहे.

संतोष गर्जे (बालग्राम)
घरच्या कौटुंबिक आपत्तीमुळे ह्या क्षेत्रात ओढला गेलेला पण तरीही परिस्थितीपुढे न डगमगता, खंबीरपणे ऊस तोडणी कामगार आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या सुमारे १२० मुलांना सांभाळणारा संतोष गर्जे हा युवक आणि ह्या कामात त्याला मदत करणारी त्याची पत्नी ऍडव्होकेट प्रीती गर्जे. केवळ लोकसहभागातून सन २००४ पासून ह्या कोवळ्या जीवांना आकार देण्याचं काम बालग्राम करीत आहे.

सुरेश राजहंस (सेवाश्रम)
प्रामुख्याने तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी सुरु झालेल्या ह्या सेवाश्रममध्ये आता अनाथ, उपेक्षित, वंचित मुलांचेही पुनर्वसन केले जाते. आसपासच्या परिसरातील सुमारे शंभरपेक्षा जास्त ऊसतोडणी कामगारांची व शेतकरी मजुरांची मुलेही आता ह्या शाळेत शिक्षण घेत आहेत. मुलांना आनंददायी शिक्षण देण्याबरोबरच संगणकाचे शिक्षण देण्याचा संकल्प सेवाश्रमने केला आहे. 

दत्ता बारगजे (इन्फन्ट इंडिया)
डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, सरकारी नोकरी सोडून दत्तामामा बारगजे यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. आज इन्फन्ट इंडियाच्या वास्तूमध्ये सुमारे ५०+ HIV बाधित मुलांचा ते सांभाळ करीत आहेत.

Tour Dates:
19th to 21st December 2024 (Only limited seats available)

Itinerary in Brief

18th DecDeparture from Dadar by 11041 SaiNagar Express at 23:55
19th DecArrival at Ahmednagar by 6:30 and proceed for Ghughal Vadgaon village (1 hr / 55 km),
Project visit and meeting with Anant Zhende,
Proceed for Arvi village (3 hrs / 140 km),
Meeting with Deepak Nagargoje of Shantivan,
Night Stay at Shantivan,
(Breakfast, Lunch & Dinner)
20th DecShantivan Project visit,
After lunch, proceed for Bramhanath Yelamb village (10 mints / 5 km),
Project visit and meeting with Suresh Rajhans of Sevashram,
Proceed for Georai village (1 hr / 50 km),
Meeting with Santosh Garje of Balgram,
Night Stay at Balgram,
(Breakfast, Lunch & Dinner)
21st DecProject visit of Balgram,
Proceed for Beed (1 hr / 50 km),
Project visit and meeting with Dattamama Bargaje of Infant India,
Proceed for Aurangabad (3 hrs / 150 km),
Depart for Mumbai by 17058 Devgiri Express at 23:25,
(Breakfast, Lunch & Dinner)
The above itinerary may change as per the prevailing weather conditions.

Tour Cost:
Rs. 12,500/- Per Person + Train Tickets
(III AC return train tickets will cost around Rs. 2,000/- per person)
Advance:
Rs. 8,000/- Per Person + Train fare

Tour Cost Includes :

  • Comman Sharing Accommodation at project,
  • All Veg meals as per itinerary,
  • Local AC Transportation,
  • All Entry Fees and Permits,
  • All Taxes.

Tour Cost Excludes:

  • Train Tickets
  • Any kind of personal expenses,
  • Any kind of item not mentioned into cost includes

Payment Terms:
Guest will be confirm only against the payment of advance. Balance amount can be paid two weeks prior to tour dates. You can directly transfer the funds to our ICICI Bank account. Bank details are available in ‘Book Now’ section on our website.

If you have any question, please feel free to call / WhatsApp us any moment on 9773510513 or 9967534396

Documentary on Shantivan
Documentory on Balgram